Department of Marathi

मराठी विभाग 

ए.आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर  

मराठी विभाग महाविद्यालयाच्या स्थापनेसोबतच १९९० साली सुरू झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण (बी.ए.-मराठी) तसेच मुद्रितशोधन आणि संपादन हा विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम विभागात घेतला जातो. विद्यार्थिनींना व्यवसाय प्रशिक्षण मिळावे आणि ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा (मनोरमा) पश्चिम सोलापूर , स्वरांजली वृत्त वाहिनी, सोलापूर आणि संस्कार संजीवनी फौंडेशन संचलित आदिवासी वंचित विद्यार्थी आश्रम, मुळेगाव यांच्याशी विभागाने सामंजस्य करार केलले आहेत.  

विभागाला वैभवशाली परंपरा आहे. अनेक प्रतिभावान लेखक विभागात कार्यरत होते. प्रा. डॉ. संजय लांडगे, डॉ. सौ. श्रुती वडगबाळकर हे विद्वान प्राध्यापक मराठी विभागात कार्यरत होते. त्यांनी यु.जी.सी. अनुदान प्राप्त बृहत् व लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. विभागातील प्रा.डॉ. कविता मुरुमकर ह्या मराठीतील एक प्रथितयश कवयित्री, कादंबरीकार, समीक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांची ‘भैरवी’, ‘मी सावित्री जोतिराव’, ‘उसवायचाय तुझा पाषाण’, ‘सुमती लांडे समग्र कविता’ ही त्यांची पुस्तके अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. सध्या मराठी विभागात डॉ. कविता मुरुमकर, डॉ. अमोगसिद्ध चेंडके, प्रा.नानासाहेब गव्हाणे, प्रा.सविता शेरीकर हे तासिका तत्वावर कार्यरत आहेत. 

सृजनात्मक क्षमता विकसित करण्यासाठी ‘भाषा संवादिनी मंडळ’ चालविले जाते व त्यामार्फत विभागात विद्वानांची व्याख्याने, निबंध, काव्यवाचन, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात. विभागाच्या वतीने विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठीय पातळीवरील चर्चासत्रे, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक म्हणून लेखक आणि कलावंताच्या मुलाखती घेण्याचेही नियोजन केले जाते. विभागाची निकालाची थोर परंपरा आहे. विद्यार्थिनींना अभ्यासक्रम अधिक सुलभतेने शिकवण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो.  

 

Faculty:

Sr.No. Name of Faculty Photo
1

Name : प्रा. डॉ. कविता मुरुमकर

Qualification : एम.ए, नेट, पी.एच. डी


Designation :सहायक प्राध्यापक


Experience :  7 Years
E-mail :  

View Profile (Full  Bio-data)

 

2 Name :प्रा.डॉ.अमोगसिध्द शिवाजी चेंडके


Qualification :एम.ए, एम.फिल, नेट जेआरएफ, सेट, पी.एच. डी
Designation : सहायक प्राध्यापक
Experience :  4 Years
E-mail :amogc1690@gmail.com

View Profile (Full Resume )

3

Name :प्रा.नानासाहेब महादेव गव्हाणे


Qualification :एम.ए, नेट, सेट, डिप्लोमा इन जर्नालिझम
Designation : सहायक प्राध्यापक   
Experience :   11 years
Email Id :gavhanenanasahebcritics@gmail.com


View Profile (Full Resume )

4

Name: प्रा. सविता नागनाथ शेरीकर


Qualification :एम. ए, सेट
Designation: सहायक प्राध्यापक
Experience:   1 yrs
Email: savitasherikar6@gmail.com


View Profile (Full Resume )

  

    

Copyright © 2023-24, A.R. Burla Mahila Varishtha Mahavidyalaya, Solapur. All rights reserved.
City Survey No. 9705/9/A/2A, Raviwar Peth, Rajendra Chowk, Dist. Solapur- 413005. MH , India.

Design & Developed By:

Ishwari Enterprises, Solapur.